बद्धकोष्ठतेसाठी आता समग्र उपचार
बद्धकोष्ठता या आजाराविषयी आपल्यापैकी अनेकजण मोकळेपणाने बोलत नाही, पण हा आजार खूप गंभीर स्वरुप धारण करू शकतो त्यामुळे त्यावर बोलणे किंवा उपचारात टाळाटाळ करणे योग्य नसते. प्रत्येक व्यक्तीनुसार बद्धकोष्ठतेच्या आजाराची लक्षणे वेगवेगळी असू शकतात, पण त्याबाबतची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. १. आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा मलविसर्जन होणे. २. कडक विष्ठा (मल) – (२५ टक्के वेळा) ३. शौचास जाऊन आल्यानंतरही पोट साफ न होणे (२५ टक्के वेळा) आपल्या आहारात फळे, भाज्यांचे किंवा फायबरचे प्रमाण पुरेसे नसल्यामुळे बद्धकोष्ठतेचा आजार जडतो. मधुमेहाला कारणीभूत ठरणारी बैठ्या कामाची व शरीराला अपायकारक ठरणाऱ्या प्रोसेस्ड फूडची जीवनशैलीही बद्धकोष्ठतेला कारणीभूत ठरते.पाणी कमी प्यायल्यामुळे पोटातील आतड्यातील (कोलन) ओलसरपणा कमी होतो व त्या परिस्थितीमध्ये बद्धकोष्ठतेचा आजार निर्माण होतो. या परिस्थितीमध्ये मोठ्या आतड्यातील पाणी शोषून घेण्याचा प्रयत्न आपले शरीर करते. पाण्याच्या कमतरतेमुळे मल (विष्ठा) मऊ न राहता ती कडक होते आणि कोलनमधून सरकण्यास अडचण निर्माण होते. बद्धकोष्ठतेच्या आजाराने ग्रस्त लोक अन...